चुंबन, बिकनी ठीक; निर्वस्त्र नाही बाई - आलिया

By Surendra Gangan | Last Updated: Wednesday, April 9, 2014 - 18:07

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सध्या चर्चा आहे ती अभिनेत्री आलिया भट्ट हिची. तिने बॉलिवूडमध्ये झोकात एंट्री केली आहे. तिने दोन सिनेमे चांगले चाललेत. आता तर तिचा ‘2 स्टेट्स’ हा सिनेमा येत आहे. मात्र, त्यापूर्वी मोठ्या पडद्यावर काम करताना तिने चक्क 21 चुंबन दृश्य दिली आहेत. तर बिकनीचा शॉटही दिला आहे. परंतु असे असले तरी बोल्डपणा दाखवताना मी निर्वस्त्र (न्यूड) होणार नसल्याचे आलियाने म्हटलंय.
सिनेमात काम करताना चुंबन देण्यात आणि बिकनी घालण्यात मला काही अडचण नाही. मात्र, मी सहजा सहजी न्यूड होण्याचे टाळणे पसंत करेन. आलियाला हा साक्षात्कार झालाय. माझ्या लक्ष्यात आलंय आपण कसे असायला हवे. आपल्या करिअरमध्ये आपण पुढे कसे जायला हवे. याबाबत मी विचार करते. मला नाही वाटत एका व्यक्तीचे विचार दुसऱ्या व्यक्तीप्रमाणे असतीलच असे नाही. ते एक समान असणाच नाहीत. जर सिनेमाच्या पटकथेला अनुसरुन असेल तर मी असे काम करण्यास राजी होईन. मात्र, अऩावश्यक असेल तर मी तसे मत व्यक्त करेन, असे आलियाने सांगितले.
मी अशी दृश्ये करणार नाही, ज्यामध्ये न्यूडपणा असेल. मी सांगू शकते, आपली विचारधारा आणि आपण कशा प्रकारे स्वत:ला लोकांसमोर तुम्ही कसे आणता, हे आपल्यावर अवलंबून आहे, असे आलिया सांगते. आलियाने आपल्या ‘स्टुडंट ऑफ द ईयर’ या सिनेमात 21 चुंबन दृश्य दिली आहेत. या सिनेमात तिने बिकनी ही घातली आहे. आता तिच्या आगामी सिनेमाकडे लक्ष आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, April 9, 2014 - 18:01
comments powered by Disqus