छे स्टार आणि मी... मुळीच नाही – आलिया भट्ट

“मला अभिनयाचा खूप मोठा अनुभव नाही. सध्या मी शिकतेच आहे. अजून मला खूप लांबचा टप्पा गाठायचा आहे. आतापर्यंत तरी अभिनयासाठी मी माझ्या दिग्दर्शकांवर अवलंबून आहे, असे करण जोहरच्या `स्टुडन्ट ऑफ द इयर` चित्रपटाने फिल्म इंडस्ट्रीत जोरदार एंन्ट्री करणारी आलिया भट्टचे म्हणणे आहे.

Updated: Oct 7, 2013, 08:24 PM IST

www.24taas.com , वृत्तसंस्था, मुंबई
“मला अभिनयाचा खूप मोठा अनुभव नाही. सध्या मी शिकतेच आहे. अजून मला खूप लांबचा टप्पा गाठायचा आहे. आतापर्यंत तरी अभिनयासाठी मी माझ्या दिग्दर्शकांवर अवलंबून आहे, असे करण जोहरच्या `स्टुडन्ट ऑफ द इयर` चित्रपटाने फिल्म इंडस्ट्रीत जोरदार एंन्ट्री करणारी आलिया भट्टचे म्हणणे आहे.
आलिया भट्टचे नाव सध्या आगामी चित्रपट आणि ब्रॅण्ड अॅण्डॉर्समेण्टमुळे फार चर्चेत आहे. मात्र, असे असतानाही आपण स्वतःला स्टार आहोत, असे समजत नसल्याचे खुद्द आलिया भट्ट म्हणाली आहे.
आलिया आता इम्तियाज अलीच्या `हायवे` आणि करण जोहरचा `२ स्टेट्स` या चित्रपटांमध्ये काम करत आहे. `हायवे`चे चित्रिकरण सुरु होण्यापूर्वी भीती वाटत होती असे आलिया म्हणाली. पण, सहकलाकार रणदीप हुड्डाने तिला मदत केल्याचेही तिने यावेळी सांगितले. तसेच, तिने `२ स्टेट्स` मधला तिचा सहकलाकार अर्जुन कपूर याचीही प्रशंसा केली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.