मीही एक बाललैंगिक शोषणाचा बळी - कल्की

बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलीन हीनं बालपणी आपणंही लैंगिक शोषणाचे बळी ठरलं असल्याचं जाहीरपणे सांगितलंय. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये कल्कीनं आपल्या शोषणाची हकीगत कथन केलीय.

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलीन हीनं बालपणी आपणंही लैंगिक शोषणाचे बळी ठरलं असल्याचं जाहीरपणे सांगितलंय. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये कल्कीनं आपल्या शोषणाची हकीगत कथन केलीय.
`मला ही घटना सार्वजनिक करायची नव्हती... ही केवळ एक हेडलाईन बनून राहावी, असं मला मुळीच वाटत नव्हतं. मी याविषयी बोलणंही टाळत होते... बालकांचं लैंगिक शोषण ही माझ्यासाठी केवळ एक हेडलाईन नाही तर एक सत्य आहे... ज्यासोबत मी अनेक वर्ष जगले` असं म्हणत कल्कीनं या घटनेला वाचा फोडली.
लहान मुलांचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी कार्यरत असणा-या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यक्रमात कल्कीने बालपणी तिला आलेल्या भयानक अनुभवाबद्दल उपस्थितांना सांगितले.
`आपल्या अनेक अशा महिला मित्र आहेत ज्यांना कोणत्या ना कोणत्या स्वरुपात लहानपणी लैंगिक शोषणाला तोंड द्यावं लागलंय... मला वाटतं, अशा घटनांकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही` असं यावेळी कल्कीनं म्हटलंय.
आपण दिलेल्या या कबुलीमुळे याप्रकारचा अनुभव आलेले इतर अनेक जण त्यांचे अनुभव आणि या सगळ्यातून त्यांनी काढलेला मार्ग याविषयी खुलेपणाने चर्चा करतील असा आशावादही यावेळी कल्कीनं व्यक्त केलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.