फोटो : श्वेता तिवारीच्या दुसऱ्या लग्नाचा सोहळा!

`बीग बॉस सीझन - ४`ची विजेती श्वेता तिवारी ही दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकलीय. यावेळी तिची मुलगी पलक हिनंही आपल्या आईच्या लग्नाचा पूरेपूर आनंद घेतला.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 14, 2013, 02:50 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
`बीग बॉस सीझन - ४`ची विजेती श्वेता तिवारी ही दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकलीय. यावेळी तिची मुलगी पलक हिनंही आपल्या आईच्या लग्नाचा पूरेपूर आनंद घेतला. शनिवारी रात्री श्वेतानं तिचा जुना मित्र अभिनव कोहली याच्यासोबत लग्नगाठ बांधलीय.

श्वेताने भोजपूरी कलाकार आणि फिल्म निर्माता राजा चौधरी याच्याशी पहिलं लग्न केलं तेव्हा तिचं वय १८ वर्ष होतं. राजा आणि श्वेताचीच मुलगी `पलक` आहे. राजाच्या त्रासाला कंटाळून श्वेताने त्याचापासून फारकत घेतली. गेले साडेतीन वर्ष श्वेता आणि अभिनव एकमेकांना भेटत होते. त्यांची मैत्री घट्ट झाली. अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. श्वेताची मुलगी पलक हिचीही या लग्नाला संमती होती.

श्वेताच्या लग्नात गायक मनोज तिवारीसहीत अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. हास्य कलाकार भारती, व्हीआयपी तसंच अभिनेता करणवीर, अभिनेत्री उर्वशी ढोलकिया हे टीव्ही स्टारदेखील या समारंभासाठी उपस्थित होते.

पलक आईच्या या निर्णयावर खूप आहे. श्वेताच्या लग्नाच्या सर्व कार्यक्रमात पलक मोठ्या उत्साहाने काम करताना दिसली. मेहंदी आणि संगीतच्या कार्यक्रमात नाचून आपला आनंद व्यक्त केला.