गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

गोव्यात आजपासून आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी सुरू होतोय. ७० देशातले १६४ सिनेमे पाहाण्याची संधी चित्रपट रसिकांना या महोत्सवात मिळणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 20, 2012, 05:30 PM IST

www.24taas.com,पणजी
गोव्यात आजपासून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी सुरू होतोय. ७० देशातले १६४ सिनेमे पाहाण्याची संधी चित्रपट रसिकांना या महोत्सवात मिळणार आहे.
४३व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी अर्थात इफ्फीसाठी गोव्यातला मांडवी तीर सज्ज झालाय. अँग ली दिग्गर्शित लाईफ ऑफ पी या सिनेमानं या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. या सोहळ्याला अक्षयकुमार, सुरज शर्मा, तब्बू, इरफान खान हे उपस्थित राहणार आहेत.
सिनेमा ऑफ द वर्ल्ड, मास्टरस्ट्रोक, फेस्टीवल कॅलीडोस्कोप, यासारख्या विभागात ७० देशातले १६४ सिनेमे या महोत्सवात दाखवले जाणार आहेत. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर क़डक बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
यंदाच्या इफ्फी महोत्सवाला उत्सवाचं स्वरुप देण्यासाठी गोवा सरकारनं कंबर कसलीय. महोत्सवाचा पदडा उघडण्यासाठी आता काही तास शिल्लक राहिल्यानं चित्रपट रसिकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.