जिया संशयी, एका एसएमएसने केला घात!

अभिनेत्री जिया खान ही संशयी होती याच संशयामुळे तिचे आणि अभिनेता आदित्य पांचोली याचा मुलगा सूरजमध्ये भांडण झाले. या भांडणाचे कारण होतं एक एसएमएस....

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 5, 2013, 05:10 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अभिनेत्री जिया खान ही संशयी होती याच संशयामुळे तिचे आणि अभिनेता आदित्य पांचोली याचा मुलगा सूरजमध्ये भांडण झाले. या भांडणाचे कारण होतं एक एसएमएस.... आत्महत्येपूर्वी अखेरच्या मिनिटापर्यंत जिया खान आणि सूरज एकमेकांशी फोनवर बोलत होते, दिवसभरात त्यांच्यात अनेक एसएमएसची देवाण-घेवाण झाली. एसएमएसमधील मजकुरावरून दोघांमध्ये किरकोळ कारणांवरून वाद झाला होता. त्यातून ते एकमेकांची समजूत काढण्याच्या प्रयत्न करत होते आणि पुन्हा भांडत होते, अशी माहिती जुहू पोलिसांना मिळाली आहे.
गेल्या वर्षापासून जिया आणि सूरज यांच्यात प्रेमसंबंध होते. ते लिव्ह इन रिलेशनमध्ये होते. शनिवारी रात्रीपासून काल सकाळपर्यंत दोघे एकत्रच होते. मात्र, निरोप घेताघेता त्यांच्यात वाद सुरू झाला. पांचोली कुटुंबियांच्या परिचयातील नीलू नावाच्या महिलेने सूरजला ‘पैसे लेने कब आऊ?’ असा एसएमएस पाठवला होता. त्यावरून सूरज आणि नीलू यांच्यात अफेअर सुरू असल्याचा संशय घेत जियाने वादाला तोंड फोडले.
मुळात नीलू ही पांचोली कुटुंबीयांची जुनी जवाहीर आहे. काही दागिन्यांचे पैसे पांचोली कुटुंबीयांकडून येणे होते. त्याबद्दल तिने एसएमएस केला होता, असा खुलासा सूरज आणि आदित्य यांनी आपल्या जबाबात केला. त्यानंतर काल रात्री ११.०७ वाजेपर्यंत सूरज आणि जिया यांच्यात अनेकवेळा फोनवरून बोलणे झाले. त्यात अनेक एसएमएसचाही समावेश होता. कधी जियाने एसएमएस करून मला तुझ्याशी बोलायचे आहे, असे आर्जव केले. तर कधी सूरजने तीच विनंती जियाकडे केली. मात्र, अखेरपर्यंत दोघांचे भांडण सुरूच होते.
एकाक्षणी मी लंडनला जाईन, अशी धमकी जियाने सूरजला दिली. तेव्हा चालायला लाग, असे प्रत्युत्तर सूरजने केले. रात्री ९च्या सुमारास मला एक चित्रपट मिळाला आहे, असेही तिने सूरजला सांगितले. तेव्हा मात्र सूरजने नोकर देवाच्या हाती जियासाठी बुके पाठवून दिला. तो तीने स्वीकारला. पण, पाच मिनिटांनी तिने तो इमारतीच्या वॉचमनला दिला आणि घरी आली. १० मिनिटांनी ती घरातून निघाली आणि सूरज राहात गांधीग्राम रोडवरील घराबाहेर गेली. तेथून तिने सूरजला फोन केला होता. मात्र, मी रागावतो तेव्हा तुझ्या घरी येतो का? असा दम त्याने दिला. त्यानंतर ती पुन्हा घरी आली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.