सलमान वगळता इतरांवर आरोप निश्चित...

By Shubhangi Palve | Last Updated: Saturday, March 23, 2013 - 11:45

www.24taas.com, जोधपूर
काळवीट शिकार प्रकरणाची सुनावणी आज जोधपूर कोर्टात पूर्ण झालीय. या सुनावणीसाठी आज सलमान पुन्हा गैरहजर राहिलाय. आज न्यायालयानं इतर स्टार आरोपींवर आरोप निश्चित केलेत. मात्र, सलमानवर आरोप निश्चिती मात्र आजही होऊ शकलेली नाही.

काळवीट शिकारप्रकरणात सलमान खानसह सैफ, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम आरोपी आहेत. आज सलमान खान वगळता चारही स्टार आरोपी कोर्टामध्ये हजर राहिले होते. सलमाननं मात्र मेडिकल सर्टिफिकेट पुढे करत आपली अनुपस्थिती दर्शवली.

आजच्या सुनावणीदरम्यान, जोधपूर न्यायालयानं सलमानचा निर्णय राखून ठेवला असला तरी इतर आरोपी म्हणजे सैफ अली खान, तब्बू, नीलम, सोनाली बेंद्रे यांच्यविरोधात आरोप निश्चित केलेत. त्यांच्याविरोधात वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अॅक्ट खाली कारवाई होणार आहे. आरोप सिद्ध झाल्यास आरोपींना सहा वर्षांची शिक्षा ठोठावली जाऊ शकते. या खटल्याची पुढची सुनावणी होणार २७ एप्रिलला होणार आहे. त्यावेळी साक्षीदारांना बोलावण्यात येणार आहे.First Published: Saturday, March 23, 2013 - 10:44


comments powered by Disqus