करण जोहर करणार सैराटचा हिंदी रिमेक?

मराठीतील ब्लॅाकबस्टर सिनेमा सैराटने प्रेक्षकांच्या मनावर आपले वेगळेच स्थान निर्माण केले. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची हवा अजून ही तशीच आहे. 

Updated: Nov 14, 2016, 05:20 PM IST
करण जोहर करणार सैराटचा हिंदी रिमेक? title=

मुंबई : मराठीतील ब्लॅाकबस्टर सिनेमा सैराटने प्रेक्षकांच्या मनावर आपले वेगळेच स्थान निर्माण केले. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची हवा अजून ही तशीच आहे. सिनेमातील अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश ठोसर यांची साधी सरऴ प्रेम कहाणी सर्वांच्या मनाला भावली. सर्वच स्तरातून या चित्रपटाचे तोंड भरून कौतुक करण्यात आले. 100कोटींच्या क्लबमध्ये पोहोचणारा सैराट पहिला सिनेमा ठरला. 

मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचणाऱ्या या सैराटचा कन्नड, हिंदी भाषेत रिमेक येणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या सिनेमाचा हिंदी रिमेक बनवण्यासाठी अनेक निर्माते पुढे आले होते. मात्र हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर आणि झीचे निर्माते या सिनेमाच्या हिंदी रिमेकची निर्मिती करणार असल्याचे समजतेय. 

दरम्यान, या कथेचा मूळ गाभा सैराटसारखाच राहणार आहे. या सिनेमाचे स्क्रीप्टिंग सध्या सुरु आहे. तसेच सैराटच्या रिमेकमध्ये पूर्णपणे वेगळी स्टारकास्ट असणार आहे. त्यामुळे रिंकू आणि आकाशच्या भूमिका कोण करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.