मौलवींच्या विरोधानंतरही करीनाचं धर्मांतर नाही

By Shubhangi Palve | Last Updated: Monday, December 10, 2012 - 10:58

www.24taas.com, नवी दिल्ली
अभिनेता आणि पतौडीचा नवाब सैल अली खान आजही हिंदू आहे. त्याची पत्नी बेगम करीना कपूर-खान हिनं लग्नानंतर इस्लाम धर्म स्वीकारल्याच्या अनेक वावड्या उठल्या होत्या. पण आता या सर्व चर्चांना करीनाची सासू शर्मिला टागोर यांनी पूर्णविराम दिलाय.
करीनानं लग्नानंतर धर्मपरिवर्तन केलेलं नाही. तिनं इस्लाम धर्म स्विकारला नसला तर ती सैफची पत्नी आहे आणि म्हणूनच ती पतौडी नवाबची बेगमही आहे. खुद्द सैफलाही नवाब म्हटलेलं आवडत नाही. या पदासाठी त्याचे वडील हीच योग्य व्यक्ती होती असं त्याला आजही वाटतं. पण तुम्ही पटौदी परिवाराशी संबंधित आहात तर तुम्हाला लोक नवाब समजणारच, असंही शर्मिला टागोर यांनी म्हटलंय.
सैफ अली खान करीना कपूर हिच्यासोबत विवाह झाला त्यावेळी अनेक मुल्ला-मौलवींनी या लग्नाला अवैध करार दिला होता. सैफ मुसलमान आहे म्हणून करीनानंही इस्लाम स्विकारायला हवा, असं त्यांचं म्हणणं होतं. पण त्यामुळे पटौदी परिवाराला काहीही फरक पडला नाही आणि सैफ-करीनानं त्यांच्या मर्जीनुसार लग्न केलं.

First Published: Monday, December 10, 2012 - 10:58
comments powered by Disqus