करिना झाली ३३ वर्षांची, सैफनं दिली लंडनमध्ये पार्टी

By Aparna Deshpande | Last Updated: Sunday, September 22, 2013 - 10:01

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अभिनेता सैफ अली खानसोबत गेल्यावर्षी विवाहबंधनात अडकलेली बॉलिवूडची ‘बेबो’ करिना कपूर आज ३३ वर्षांची झालीय. करिना आपला वाढदिवस लंडनमध्ये साजरा करतेय.
लग्नानंतरचा हा करिनाचा पहिलाच वाढदिवस आहे. आपल्या नवऱ्याबरोबर म्हणजेच सैफ बरोबर करिना सध्या लंडनमध्ये आहे. सैफनं लंडनमध्ये खास पार्टीचं आयोजन केलंय. सैफ लंडनमध्ये आपल्या आगामी चित्रपटाचं शूटिंग करतोय.
करिनाचंही करिअर लग्नानंतर चांगलंच जोरात सुरू आहे. तिच्या काही चित्रपटांनी चांगला व्यवसाय केला असून करिनाच्या हाती सध्या काही मोठ्या ऑफर्सही आहेत. करण जोहरनं आपला आगामी चित्रपट ‘शुद्धी’साठी करिनाला साईन केलंय. या फिल्ममध्ये करिना अभिनेता हृतिक रोशन सोबत दिसेल. याशिवाय करिना इमरान खानसोबत ‘इक मैं और इक तू’ मध्ये सुद्धा झळकेल.
काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या करिनाच्या ‘सत्याग्रह’नं चांगला व्यवसाय केला. या चित्रपटात तिनं एका महिला पत्रकाराची भूमिका केली होती. आपल्या आगामी चित्रपटांद्वारं करिना प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करेल हा विश्वास ठेवून करिनाला वाढदिवसाच्या खूप खूप शूभेच्छा!

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, September 22, 2013 - 10:01
comments powered by Disqus