नवाब सैफची पत्नी करीना प्रेग्नंट!

By Surendra Gangan | Last Updated: Tuesday, September 3, 2013 - 18:31

www.24taas.com झी मीडिया, मुंबई
गती वर्षी लग्नाच्या बंधनात बांधली गेलेली बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर आता एका वेगळ्या विषयामुळे चर्चेत आलीय. अभिनेता सैफ अली खानसोबत लग्न करणारी करीना कपूर आता आई होणार असल्याची चर्चा सध्या जोरात चालू आहे.
करीनाचा आगामी सिनेमा `गोरी तेरे प्यार`मध्ये करीना एका गर्भवती महिलेच्या भूमिकेत आहे. आणि त्यामुळे तिला बेबी बंप देण्यात आला होता.
या सिनेमाच्या शुटींग दरम्यान तिने अनारकली सलवार सुट घातला होता त्यामुळे ती गर्भवती असलेली लोकांना दिसली. त्यामुळे लोकांचा करीना गरोदर असल्याचा गैरसमज झाला.
दिग्दर्शक पुनीत मल्होत्रा यांचा ‘गोरी तेरे प्यार’ सिनेमा आहे. या सिनेमात करीना आईच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत इमरान खान हा प्रमुख भूमिकेत आहे. हा सिनेमा येत्या नोव्हेंबरला रिलीझ होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, September 3, 2013 - 15:19
comments powered by Disqus