करिनाला नकोय सैफचं एकही अपत्य!

By Shubhangi Palve | Last Updated: Wednesday, June 5, 2013 - 14:04

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आपल्या कर्तृत्वावर आणि आपल्या विचारांवर ठाम असलेली बेबो प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं वेगळेपण सिद्ध करताना दिसते. गेल्याच वर्षी तीनं आपल्या धर्मात बदल न करताच पतौडी नवाब सैफ अली खानची बेगम होण्याचा निर्णय घेतला. बेगम झाल्यानंतर आता करिनाला मात्र सैफ अली खानच्या मुलांची आई होण्यात फारसा रस नसल्याचं तीनं म्हटलंय.
एका मुलाखतीदरम्यान बोलताना करिनानं या गोष्टीचा खुलासा केलाय. कदाचित सैफ अली खान आणि करिनाचं एकही अपत्य होणार नाही, असं तीनं बिनदिक्कतपणे सांगितलंय. ‘या अगोदर एक वेळ अशी होती की भेटणारा प्रत्येक जण विचारायचा की, तू लग्न कधी करणार आहेस? आता लग्नानंतर प्रत्येक जण विचारतोय की तू मुलाचा विचार कधी करणार? कुणाला माहित... मी कदाचित एकही मूल होई न देण्याचा निर्णयही घेऊ शकते. मी आता तर फक्त ३२ वर्षांची आहे आणि सैफला तर अगोदरपासूनच दोन मुलं आहेत. आम्ही काही सर्वसाधारण नवरा-बायकोसारखे नाहीत जे फक्त मुलं हवीत म्हणून लग्नाच्या बंधनात अडकतात... आम्ही आधुनिक आहोत, आमचे विचार वेगळे असू शकतात’.

करिना तिच्या सावत्र मुलांना – सारा आणि इब्राहिम (सैफ आणि अमृता सिंग यांची मुलं) आपलीचं मुलं मानते हे ऐकून कदाचित सैफलाही बरं वाटेल. पण, करिनाला तिचं स्वत:चं एकही मूल नकोय हे ऐकून अनेकांच्या भुवया उंचावतील हे मात्र नक्की!

तसं पाहिलं तर उत्तराधिकारी कायद्यानुसार (इनहेरिटन्स लॉ) करिनाची आणि सैफची अपत्य सैफच्या संपत्तीसाठी उत्तराधिकारी म्हणून पात्र ठरणार नाहीत. कारण लग्नाच्या वेळी करिनानं सैफच्या धर्माचा म्हणजेच इस्लामचा स्वीकार केला नव्हता. धर्मांतर न करता लग्न केल्यानं तीनं तिच्या सासूच्या – शर्मिला टागोर यांच्या - पुढे एक पाऊल टाकलं होतं. या पार्श्वभूमीवर आता एकही अपत्य न होऊ देण्याचा निर्णय ती अत्यंत विचारानं घेतला असेल असं म्हणायला हरकत नाही.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, June 5, 2013 - 14:04
comments powered by Disqus