बेगम करिनाचं लग्नानंतर पहिलचं फोटोशूट...

बॉलिवूडची बेबो आता सध्या भलतीच फॉर्मात आली आहे. फेविकॉलवर आपले लटके झटके दाखवल्यानंतर बेबो आता एक खास फोटोशूट करणार आहे.

Updated: Feb 5, 2013, 03:24 PM IST

www.24taas.com, हैद्राबाद
बॉलिवूडची बेबो आता सध्या भलतीच फॉर्मात आली आहे. फेविकॉलवर आपले लटके झटके दाखवल्यानंतर बेबो आता एक खास फोटोशूट करणार आहे. बेगम करीनाने लग्नानंतर आपलं पहिलवहिलं फोटोशूट केलं आहे.. तेसुद्धा एका नामांकित मॅग्झिनच्या कव्हर पेजसाठी..
बेगम करीना कपूरचं खास फोटोशूट करण्यात आलं आणि ते सुद्धा एका नामांकित मॅग्झिनच्या कव्हरपेजसाठी.. यासाठी करिनाने बऱ्याच हॉट पोझही दिल्या. हैद्राबादमधल्या एका पॅलेसमध्ये हे फोटोशूट करण्यात आलं आहे.. बेबोच्या कातील अदा, तिचा हटके लूक हेच बेबोच्या या फोटोशूटचं वैशिष्ट्य ठरलं आहे.
ग्लॅमर आणि ब्युटीचा मिलाप असलेल्या करीनाचं हे कव्हरपेज नक्कीच खास असणार यात शंकाच नाही. बेबो आता पुन्हा नव्याने बॉलिवूडमध्ये आपला जलवा दाखवते आहे.