करीना कपूरचा सैफला`किस`करण्यास नकार

By Jaywant Patil | Last Updated: Tuesday, August 27, 2013 - 17:54

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
करीना कपूरने सैफ अली खानशी लग्न केल्यापासून सैफ अली खान पूर्णपणे करीनाच्याच ताब्यात असलेलं पाहायला मिळतं. करीना कपूरने सैफ अली खानशी लग्न केलं, तरी तिने धर्म बदलला नाही. रमझानच्या महिन्यात रोझे पाळले नाहीत. ताबडतोब कामावर दाखल झाल्यामुळे सैफसाठी कधी स्वयंपाक केला नाही. आता तर करीना सैफला ‘किस’ही करू देत नाही!
विवाहानंतर सिनेमांमध्ये इतर कुठल्याही सहकलाकारसोबत किसिंग सीन करायचे नाहीत, असा करार विवाहापूर्वीच सैफ करीनाने केला होता. नुकत्याच एका सिनेमाची कथा ऐकण्यासाठी सैफ अली खानसोबत करीना कपूर दिग्दर्शकाकडे गेली होती. तेव्हा तिने या प्रसंगाची आठवण करून दिली. कथेमध्येच जेव्हा किसिंग सीनचा उल्लेख आला, तेव्हा करीनाने हा सीन बदलण्याची सूचना दिली. सैफ अली खानने कुठल्याही अभिनेत्रीला ‘किस’ करता कामा नये, असं करीनाने स्पष्टपणे सांगितलं. “जर लग्नानंतर मी कुठल्याही अभिनेत्यासोबत किसिंग सीन्स देत नाही, तर माझ्या पतीने असे सीन्स का द्यावेत?” असा प्रश्न विचारत तिने सैफ अली खानला किसिंग सीन देण्यास आडकाठी केली. दिग्दर्शकालाच नव्हे, तर पती सैफ अली खानलाही करीनाची ही सूचना पाळावीच लागली.
करीना स्वतःही हा नियम कसोशीने पाळत आहे. त्यामुळे जेव्हा आगामी सिनेमात सिरीयल किसर इमरान हाश्मी सोबत करीना कपूरला किसिंग सीन देण्याची वेळ आली, तेव्हा करीनाने किसींगसाठी नकार दिला. करण जोहरच्या शुद्धी या सिनेमातही हृतिक रोशनसोबत किसिंग सीन देण्यास करीनाने नकार दिला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, August 27, 2013 - 17:43
comments powered by Disqus