कतरीनाची बहिण अडकली विवाह बंधनात!

बॉलिवूडची हॉट आणि सेन्सेशनल अभिनेत्री कतरीना कैफची बहिण नताशा रविवारी विवाह बंधनात अडकली. हा लग्नसमारंभ लंडनला झाला. त्यासाठी कतरीनाही लंडनला पोहोचली होती.

Aparna Deshpande | Updated: Aug 26, 2013, 12:44 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
बॉलिवूडची हॉट आणि सेन्सेशनल अभिनेत्री कतरीना कैफची बहिण नताशा रविवारी विवाह बंधनात अडकली. हा लग्नसमारंभ लंडनला झाला. त्यासाठी कतरीनाही लंडनला पोहोचली होती.
रणबीर कपूरला भेटायला कतरीना श्रीलंकेला जाणार असल्याची चर्चा होती. मात्र जेव्हा शनिवारी रात्री ती लंडनला जायला निघाली. तेव्हा ही सगळी अफवा असल्याचं स्पष्ट झालं.
कतरीनाच्या बाबतीतल्या या अफवेनं तिच्या एका मित्रानं राग व्यक्त केला. कतरीना आपल्या बहिणीसाठी गिफ्ट खरेदी करण्यातही बिझी असल्याची चर्चा होती. मात्र ही सुद्धा अफवा असल्याचं तिच्या जवळच्या मित्रानं सांगितलं. नताशाच्या विवाहासाठीच ती लंडनला गेलीय. तिथं काही दिवस थांबून ती परतणार आहे. कतरीना सध्या ‘धूम ३’ आणि ‘बँग बँग’ हे कतरीनाचे आगामी चित्रपट येऊ घातलेत.
एकूणच बहिणीचं तर झालं आता कतरीना स्वत: कधी सात फेरे घेणार, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.