बच्चन फॅमिलीत पुन्हा एकदा लग्नाची सनई वाजणार?

बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांची भाची नैना बच्चन आणि ‘रंग दे बसंती’ फेम कुणाल कपूर यांची वाढती जवळीक चांगलीच चर्चेत आहे.

शुभांगी पालवे | Updated: Dec 5, 2013, 02:35 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई
बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांची भाची नैना बच्चन आणि ‘रंग दे बसंती’ फेम कुणाल कपूर यांची वाढती जवळीक चांगलीच चर्चेत आहे.
नैना ही अमिताभ यांच्या सख्या भावाची म्हणजेच अजिताभ बच्चन आणि रमोना यांची मुलगी आहे. नैना याआधी लंडनमध्ये होती. ‘इन्व्हेस्टमेंट बँकर’ची नोकरी सोडून नैना मुंबईत दाखल झालीय. सध्या, मुंबईत नाटकांत काम करणाऱ्या नैनाची भेट कुणालशी नुकतीच एका थिएटर वर्कशॉप दरम्यान झाली होती. नाटकाची आवड असल्यानंच ती नोकरी सोडून मुंबईत दाखल झालीय.
सार्वजनिक ठिकाणी ही दोघं एकमेकांना टाळत असली तर गेल्या शनिवारी आमीर खानच्या मुलाच्या-आझादच्या पार्टीत ही जोडी एकाच गाडीत पार्टीच्या ठिकाणी दाखल झाली होती. त्यानंतर मात्र आता या दोघांनाही सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसण्यास काहीही हरकत नाही, असंच दिसतंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.