‘महाराष्ट्राचा फेव्हरेट'… दुनियादारीच!

By Shubhangi Palve | Last Updated: Monday, December 2, 2013 - 11:37

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘महाराष्ट्रचा फेव्हरेट कोण?’ हा पुरस्कार सोहळा रविवारी मुंबईत रंगला. ‘दुनियादारी’ चित्रपटाने फेव्हरेट सिनेमाचा पुरस्कार जिंकला. त्याचबरोबर दुनियादारीचे संजय जाधव ‘फेव्हरेट दिग्दर्शक’ ठरले. महाराष्ट्राचा ‘फेव्हरेट नायक’ ठरला... स्वप्नील जोशी तर ‘फेव्हरेट नायिका’ सई ताम्हणकर...
पुरस्कार सोहळ्यात ‘दुनियादारी’च्या टीमने तब्बल १२ पुरस्कार जिंकत पहिला मान मिळवला. ‘दुनियादारी’ चित्रपटातलं ‘टीक टीक वाजते डोक्यात...’ हे गाणं फेव्हरेट ठरलं. या गाण्याचा गायक सोनू निगम आणि गायिका सायली पंकज हेही फेव्हरेट ठरले. सहाय्यक व्यक्तीरेखेत पुरूष गटात दुनियादरीतील अभिनयाबद्दल अंकुश चौधरी तर महिला गटात उर्मिला कानेटकर विजेते ठरले. दुनियादारीतील खलनायकाच्या भूमिकेबद्दल जितेंद्र जोशी फेव्हरेट ठरला.

‘फेव्हरेट विनोदी कलाकारा’चा पुरस्कार खो-खो चित्रपटातील अभिनयाबद्दल सिद्धार्थ जाधवला देण्यात आला. स्वप्नील जोशी ‘फेव्हरेट स्टाईल आयकॉन’ ठरला तर सई ताम्हणकर ‘फेव्हरेट पॉप्युलर फेस’ची मानकरी ठरली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, December 2, 2013 - 11:01
comments powered by Disqus