द बॅचलरेट इंडिया : मल्लिकाचा गेला तोल

Last Updated: Saturday, September 28, 2013 - 15:24

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत आपल्या आगामी ‘द बॅचलरेट इंडिया – मेरे ख्यालों की मल्लिका’साठी खूपच उत्सुक आहे. पण, या ओव्हर एक्साईटमेंटमध्ये ती जखमी झालीय.
आपल्या आगामी कार्यक्रमाचा प्रोमो शूट दरम्यान मल्लिका जखमी झालीय. उदयपूरमध्ये ‘द बॅचलरेट इंडिया – मेरे ख्यालों की मल्लिका’ या रिअॅलिटी डेटिंग कार्यक्रमाचं शूट होतं. या कार्यक्रमाचा चेहरा असलेली ३६ वर्षीय अभिनेत्री मल्लिका शेरावत एका मोटारसायकलवर बसून शॉट देत होती. पण, या दरम्यान तिचा तोल गेला आणि ती मोटारसायकलवरून खाली पडली. यामध्ये ती थोडी जखमी झालीय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रोमो शूट दरम्यान मल्लिकाला एका छोट्या दुर्घटनेला सामोरं जावं लागलं. पण, तीनं स्वत:ला सावरलं आणि पुन्हा शूटसाठी ती उभी राहिली.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, September 28, 2013 - 15:24
comments powered by Disqus