महाबळेश्वरवर शॉर्टफिल्म, मिलींद गुणाजी ब्रॅण्ड अॅम्बेसिडर!

By Aparna Deshpande | Last Updated: Thursday, October 31, 2013 - 08:38

www.24taas.com, झी मीडिया, महाबळेश्वर
महाबळेश्वरचं विलोभनीय सृष्टीसौंदर्य देशभरात पोहचवण्यासाठी लघुपटाची निर्मिती केली जातेय. महाबळेश्वरचा ब्रॅण्ड अॅम्बेसिडर अभिनेता मिलिंद गुणाजी याचा सहभाग असलेल्या लघुपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ नुकताच झाला.
प्रारंभी पालिकेत ढोल-ताशांच्या गजरात गुणाजी यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत लिंगमळ वॉटर फॉल इथं चित्रीकरणास प्रारंभ झाला. यावेळी महाबळेश्वरचे नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, मुख्याधिकारी सचिन पवार, हॉटेल संघटनेचे अध्यक्ष कैलेश तेजानी या मान्यवरांसह लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठया संख्येनं उपस्थित होते.
येत्या काही वर्षात महाबळेश्वरला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या पंधरा लाखावरुन वीस लाखांपर्यंत जाईल, असा विश्वास गुणाजी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, October 31, 2013 - 08:38
comments powered by Disqus