अदनान सामीने देश सोडावा; मनसेची मागणी, MNS OPPOSE TO ADNAN SAMI STAY IN INDIA

अदनान सामीने देश सोडावा; मनसेची मागणी

अदनान सामीने देश सोडावा; मनसेची मागणी
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

पाकिस्तानी गायक - संगीतकार अदनान सामीने देश सोडावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केलीय.

अदनान सामीच्या व्हीजाची मुदत संपल्यानं त्यानं भारत सोडून पुन्हा आपल्या मायदेशी अर्थात पाकिस्तानात जावं, असं मनसेनं म्हटलंय. याबाबत मनसे चित्रपट सृष्टी कर्मचारी सेना अध्यक्ष अमेय खोपकर आणि शालिनी ठाकरे यांच्यात राजगडावर चर्चाही झालीय.

संगीतकार गायक अदनान सामी आणि त्याची पत्नी सबाह गालादरी यांच्यातल्या वादानंतर अदनान सामीचा व्हिजा संपल्यानंतरही तो अजून भारतात राहात आहे, असं उघड झालं होतं. अदनान सामीला यासंबंधी सबाहच्या वकिलांतर्फे सामीची उलटतपासणी करण्यात आली असताना आपल्याला याबाबत माहिती नसल्याचं तो म्हणाला. त्याच्या विसा ६ ऑक्टोबरपर्यंतच वैध होता. याबाबत अदनान सामीनंही स्पष्टीकरण दिलंय. आपला व्हीसा ६ ऑक्टोबरला संपल्याचं तो मान्य करतोय. पण व्हीसाचं नुतनीकरण होत असल्याचं त्यानं सांगितलंय.

पाकिस्तानी कलाकारांना प्रोत्साहन कशासाठी द्यायचं? त्यांना उगीचच का गोंजारायचं? अशी भूमिका काही महिन्यांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडली होती. मनसेनं पाकिस्तानी कलाकारांना विरोध केल्यानंतर शिवसेनाही या आखाड्यात उतरली होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, October 12, 2013, 21:44


comments powered by Disqus