बिग बींना दिली माकडाने कानाखाली!

भूतकाळात रमणे हा मानवी स्वभाव आहे. प्रत्येकालाच आपल्या आयुष्यातील काही विशेष प्रसंग किंवा घटना या आठवायला आवडतात. याला अपवाद बिग बी देखील नाही. काही जण त्या आठवणी खूप छान सांगतातही.

Updated: Oct 18, 2013, 09:20 PM IST

www.24taas.com , वृत्तसंस्था, मुंबई
भूतकाळात रमणे हा मानवी स्वभाव आहे. प्रत्येकालाच आपल्या आयुष्यातील काही विशेष प्रसंग किंवा घटना या आठवायला आवडतात. याला अपवाद बिग बी देखील नाही. काही जण त्या आठवणी खूप छान सांगतातही.
अमिताभ बच्चनही सध्या काही दिवसांपासून आपले काही जुने फोटो फेसबुक आणि ट्विटरवर पोस्ट करीत आहेत. तसेच त्या संबंधीच्या मजेशीर घटनाही रंजक पध्दतीने ते मांडत आहेत. अलीकडेच त्यांनी गंगा की सौगंधच्या शूटिंगच्या वेळेचा फोटो पोस्ट केला आहे.
या फोटोत महानायक अमिताभ बच्चन त्यांच्या मेकअप मॅन दीपक सावंत सोबत आहेत. माकडांना बिग बी आणि त्यांचे मेकअप मॅन चणे आणि केळी खाऊ घालतांना दिसत आहेत. १९७८ ला रिलीज झालेल्या गंगा की सौगंधचे शूटिंग आटोपून हरिद्वार जवळील लक्ष्मण झुला रोडवरून परतत असतांना हा फोटो काढला आहे.
बिग बींनी या फोटोची आठवण सांगितलीय की आम्ही येत असतांना ही काही माकडं दिसली. ते प्रत्येक कारजवळ जाऊन काही खायला मिळवायचा प्रयत्न करत होते. मी कार थांबवली आणि माझ्याकडे असलेली केळी आणि चणे त्या माकडांना खाऊ घालू लागलो. त्यातच काही ३/४ माकडं दूर होते. त्यांना मी काही देत नव्हतो. ते पळत आले आणि त्यांनी माझ्या आजुबाजूला उड्या मारल्या आणि एकाने तर माझ्या गालातच ठेऊन दिली. म्हणजे माझे लक्ष वेधून घेण्यासाठी.
नेमके मला मारणारे माकड होते की माकडीण हेच माझ्या लक्षात आले नाही असेही अमिताभ पुढे गंमतीने लिहीतात.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.