आईने माझे १६ वर्षीच लग्न केले असते- कंगना राणावत

By Prashant Jadhav | Last Updated: Friday, May 10, 2013 - 16:37

www.24taas.com, झी मीडिया, दिल्ली
मी माझ्या आईचे म्हणणे ऐकले असते तर माझे १६ वर्षीच लग्न झाले असे गुपीत अभिनेत्री कंगना राणावत यांनी उघड केले आहे. थँक यू मॉम या कार्यक्रमात कंगना राणावत बोलत होती.
लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत कंगना म्हणाली, मला लहानपणी झाडूने मार पडत असतं, यापेक्षा कोणतीच आठवणीतली गोष्ट असू शकत नाही. माझी आई संस्कृतची शिक्षिका होती, तीला सर्व जण घाबरत होते.
माझ्या आईची इच्छा होती की मी १६ वर्षी लग्न केलं पाहिजे. तिला वाटत होतं की हे लग्नासाठी योग्य वय आहे. माझ्या घरात लग्नाचा विषय नेहमी चर्चिलेला जात असत. आजही माझ्या भावाचे वय २२ वर्ष आहे आणि तिला वाटते की त्याचे लग्नाचे वय सरून चालले आहे.
यावेळी कंगनाला विचारले की ती लव्ह मॅरेज करणार की अरेंज तर तीने या प्रश्नाला उतर दिले नाही. यावेळी कंगनाची आई आशा राणावत या देखील उपस्थित होत्या. तसेच शक्ती कपूर यांची मुलगी श्रद्धा कपूर आणि अभिषेक कपूरही उपस्थित होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 9, 2013 - 18:52
comments powered by Disqus