मराठी दिग्दर्शक राजीव पाटील यांचं निधन

सामाजिक विषयांवर आशयघन चित्रपट बनवणारे मराठी दिग्दर्शक राजीव पाटील यांचं आज मुंबईत हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झालं आहे.

जयवंत पाटील | Updated: Sep 30, 2013, 04:26 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सामाजिक विषयांवर आशयघन चित्रपट बनवणारे मराठी दिग्दर्शक राजीव पाटील यांचं आज मुंबईत हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झालं आहे. मुंबईतील भगवती रुग्णालयात त्यांचं निधन झालं. ७२ मैल- एक प्रवास हा त्यांचा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं.
सावरखेड एक गाव या सिनेमापासून राजीव पाटील यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. मराठीतील साहित्यकृतींवर चित्रपट बनवणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. सनई- चौघडे, पांगिरा, जोगवा हे त्यांचे चित्रपट गाजले होते. जोगवा चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला होता. `वंशवेल` या नव्या सिनेमाचं ते दिग्दर्शन करत होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.