नवीन वर्षात होणार रणबीर-कतरिनाचा साखरपुडा?

Last Updated: Sunday, December 1, 2013 - 20:04

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
रणबीर कपूर आणि कतरिना कैफ हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. बोललं जातंय की, हे दोघं न्यूयॉर्कमध्ये येत्या नवीन वर्षात म्हणजेच २०१४मध्ये आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रणबीर आणि कतरिना कैफ आगामी वर्षात साखरपुडा करण्याचे चिन्ह आहेत. दोघंही डिंसेबर महिन्याच्या अखेरीस अमेरिकेत राहण्याच्या विचारात आहे, तिथंच साखरपुडा करण्याचा त्यांचा विचार आहे.
रणबीर कपूर या दिवसात अनुराग बासूचा ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तरी सुद्धा तो वेळ काढून अमेरिकेला जावू शकतो. तर तिकडे कतरिनाचा ‘धूम-३’ हा चित्रपट क्रिसमसच्या मुर्हूतावर २० डिंसेबरला रिलीज होणार आहे. त्यानंतर कतरिना आपल्या कुटुंबासह ख्रिसमस साजरा करण्यासाठी लंडनला जावू शकते आणि तिथून ती अमेरिकेला जाण्याची शक्यता आहे.
नव्या वर्षात रणबीर आणि कतरिना आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करु शकतात. मात्र अजूनही दोघांपैकी कुणीही या विषयावर आपलं मौन सोडलेलं नाही. तेव्हा आता येणारा काळच सांगेल, रणबीर-कतरिना खरोखरच सहजीवन स्वीकारतात की आणखी वेळ लावतात.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.First Published: Sunday, December 1, 2013 - 19:19


comments powered by Disqus