सैफ-करीनाचा `निकाह` झालाच नाही!

सैफ-करीनाने निकाह केलाच नाही. त्यांनी फक्त एकमेकांना अंगठी घातली. करीना कपूरची आई बबिता ख्रिश्चन धर्म पाळत असल्याने त्यांनी ख्रिस्ती पद्धतीने एकमेकांना अंगठी घालून काही वचनांची देवाण घेवाण केली.

जयवंत पाटील | Updated: Oct 17, 2012, 05:11 PM IST

www.24taas.com, मुंबई
सैफ अली खान आणि करीना कपूरच्या प्रेमाला काल कायदेशीर परवाना मिळाला आहे. दोन्ही कलाकारांनी आप्त स्वकीयांच्या उपस्थितीत रजिस्टर्ड विवाह केला आणि संध्याकाळी आपल्या वांद्र्याच्या घरी स्वागत समारंभ आयोजित केला होता.

मात्र तरीही सैफ-करीनाने निकाह केलाच नाही. त्यांनी फक्त एकमेकांना अंगठी घातली. करीना कपूरची आई बबिता ख्रिश्चन धर्म पाळत असल्याने त्यांनी ख्रिस्ती पद्धतीने एकमेकांना अंगठी घालून काही वचनांची देवाण घेवाण केली.

करीनाचा जवळचा मित्र आणि फॅशन डिझायनर असलेल्या मनीष मल्होत्राने या संदर्भात गौप्यस्फोट केला. मनीष मल्होत्राने सांगितलं, की सैफ करीनाने कुलाब्याच्या ताज हॉटेलमध्ये एकमेकांना फक्त काही वचनं दिली. त्यांनी निकाह केला नाही किंवा सात फेरेही घातले नाहीत. सैफ करीनाने कुठल्याच एका धार्माच्या रीती-रिवाजांनुसार विवाह केला नाही. मात्र त्यांच्या विवाहाबद्दल रणधीर कपूर यांना विचारले असता त्यांनी मुलीने धर्मांतर न केल्याबद्दल समाधान व्यक्त केलं.