प्रीतीचा चेक बाऊन्स; अजामीनपात्र वॉरंट!

बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा पुन्हा एकदा एका वेगळ्या वादात अडकलीय. मुंबईच्या अंधेरी कोर्टानं प्रीतीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केलंय.

शुभांगी पालवे | Updated: Sep 12, 2013, 01:38 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा पुन्हा एकदा एका वेगळ्या वादात अडकलीय. मुंबईच्या अंधेरी कोर्टानं प्रीतीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केलंय.
सूत्रांच्या माहितीनुसार, चेक बाऊन्स प्रकरणी प्रीती झिंटाला हे वॉरंट बजावण्यात आलंय. लेखक अब्बास टायरवाला यांनी प्रीतीविरुद्ध चेक बाऊन्स झाल्याची तक्रार दाखल केली होती. तब्बल १८ लाख ९० हजार रुपयांचा हा चेक बाऊन्स झाला. यावर प्रीतीला कोर्टात हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले होते.

परंतु, कोर्टानं बजावल्यानंतरही सलग चौथ्यांदा प्रीती कोर्टात हजर झाली नाही. त्यामुळे तिला अजामीनपात्र वारंट बजावण्यात आलंय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.