कुणाल देशमुखच्या सिनेमात नवी पाकिस्तानी अभिनेत्री!

By Jaywant Patil | Last Updated: Tuesday, July 2, 2013 - 17:46

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पाकिस्तानी कलाकारांना भारतात कितीही विरोध होत असला, तरी पाकिस्तानी कलाकारांचं भारतात येणं थांबत नाही. पाकिस्तानातून आलेल्या अनेक अभिनेत्रींनी भारतात आपला जम बसवला. सलमा आगापासून ते साशा आगापर्यंत पाकिस्तानी अभिनेत्रींची भारतीय सिनेमांमध्ये परंपरा निर्माण झाली. वीना मलिकने अश्लील फोटो आणि आक्षेपार्ह चाळ्यांनी बॉलिवूड चांगलंच गाजवलं. साशा आगाच्याही ऑरंगजेबमधील न्यूड सीनने बॉलिवूडमध्ये खळबळ माजली. आता आणखी एक पाकिस्तानी अभिनेत्री त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून भारतात दाखल होत आहे.
फिल्म `बोल`मधून प्रसिद्ध झालेली पाकिस्तानी अभिनेत्री हुमैमा मलिक आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या आधी दोनदा प्रयत्न करूनही तिला भारतीय सिनेमात काम करायला मिळत नव्हतं. मात्र आता कुणाल देशमुखच्या एका सिनेमात हुमैमाला संधी मिळाली आहे. या सिनेमात तिच्यासोबत इमरान हाश्मी असेल. भट्ट कंपनीची निर्मिती असलेला हा सिनेमा बोल्ड असेल. मात्र या सिनेमाचं नाव अजून निश्चित करण्यात आलेलं नाही. तसंच हुमैमाच्या स्क्रीन टेस्टनंतरच तिची निवड करण्यात येणार आहे.
कुणाल देशमुखने यापूर्वी ‘जन्नत’ आणि ‘जन्नत २’ या सिनेमांचं दिग्दर्शन केलं होतं. या दोन्ही सिनेमांमध्ये इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत होता. आगामी सिनेमातही इमरान हाश्मीच हिरो असणार आहे. त्याची आणि हुमैमाची हॉट केमिस्ट्री या सिनेमातून पाहायला मिळेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, July 2, 2013 - 17:46
comments powered by Disqus