पाकिस्तानी गायक अदनान सामीला देश सोडण्याचे आदेश

By Surendra Gangan | Last Updated: Tuesday, October 15, 2013 - 13:42

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पाकिस्तानी गायक अदनान सामीला मुंबई पोलिसांनी मंगळवारी दणका दिला आहे. व्हिसाची मुदत संपूनही मुंबईत राहणाऱ्या सामीला३० दिवसांच्या आत देश सोडून देण्याचे आदेश दिले आहे.
या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अदनान सामीला दंड आकारल्याचे वृत्त असून या दंडाची नेमकी रक्कम समजू शकलेली नाही. पाकिस्तानमधील गायक अदनान सामी हा गेल्या काही वर्षांपासून मुंबईत राहत आहे. अदनान सामीचा व्हिसा ६ ऑक्टोबर रोजी संपला आहे.
व्हिसाची मुदत संपूनही सामी देश सोडून पाकिस्तानात परतत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नुकताच अदनान सामीला पाकला परत जाण्याचा इशारा दिला होता. तर अदनान सामीने व्हिसासाठी पुन्हा अर्ज केल्याचे स्पष्टीकरण दिले होते. यानंतर आता मुंबई पोलिसांनी सामीला दंड ठोठावला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, October 15, 2013 - 13:39
comments powered by Disqus