आत्महत्येनंतर जिया खानच्या बॉयफ्रेंडची चौकशी....

Last Updated: Tuesday, June 4, 2013 - 15:36

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
जिया खानचा बॉयफ्रेंड सुरज पांचोलीला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावून घेतलंय. काल रात्री जिया खान आत्महत्येपूर्वी मोबाईलवरून सुरजसोबत बोलत होती. त्यामुळे चौकशीसाठी त्याला पोलिसांनी बोलावून घेतलं आहे.
सुरज हा अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा आहे. आदित्यच्या चौकशीअंती काही माहिती बाहेर येतेय का याचा तपास आता पोलिसांकडून केला जातो आहे.
दरम्यान दोन महिन्यांपासून जिया आणि सुरज बोलत नव्हते, त्यांच्यात काही वादविवाद होते अशीही माहिती समोर येतेयं. मात्र त्या दोघांमध्ये घनिष्य मैत्री होती अशीही माहिती मिळतेय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, June 4, 2013 - 14:15
comments powered by Disqus