पूूनम पांडे हिचे मीरारोड येथे अश्लिल हावभाव

अभिनेत्री पूनम पांडेला मीरारोड पोलिसांनी शिवार परिसरातून ताब्यात घेतलं. पूनम पांडे सार्वजनिक ठिकाणी अश्लिल हावभाव आणि इशार करत असल्याचं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलंय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 3, 2014, 02:58 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अभिनेत्री पूनम पांडेला मीरारोड पोलिसांनी शिवार परिसरातून ताब्यात घेतलं. पून पांडे सार्वजनिक ठिकाणी अश्लिल हावभाव आणि इशार करत असल्याचं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलंय.
बारचवेळ चौकशी केल्यानंतर तिला सोडून देण्यात आलं. तिच्यावर पोलीस अॅक्ट 110 आणि 117 नुसार कारवाई करून सोडून देण्यात आलं. याआधीही तिच्यावर अशाच प्रकारची करावाई करण्यात आली होती.
पूनम पांडेला अश्लील कृत्य करताना मिरा रोड येथे ताब्यात घेतलं. २ मे रोजी रात्री मिरा रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत शिवार गार्डन इथे आपल्या कारबाहेर उभी राहून शॉर्ट कपडे घालून अश्लील कृत्य करत असल्याचे पोलिसांना आढळून आलं.

दरम्यान, पूनम पांडे काय अश्लील कृत्य करत होती की नाही, याबाबत पोलिसांनी नकार दिला. मात्र तोकडे कपडे घालून गाडीबाहेर अश्लील हावभाव करत असल्याचे सांगितले. एका बड्या नेत्याचा फोन आल्याने तिला सोडून दिल्याची चर्चा आहे.

पाहा व्हिडिओ

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.