विवाहापूर्वी `ते` बिनधास्त करा - शर्लिन चोप्रा

By Surendra Gangan | Last Updated: Tuesday, December 3, 2013 - 19:41

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सातत्याने या ना त्या कारणाने प्रसिद्धी झोतात असणारी बिनधास्त आणि बोल्ड अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने धक्कादायक विधान केले आहे. विवाहापूर्वी सेक्स करायलाच पाहिजे, असे बेधड वक्तव्य शर्लिन हिने केलंय.
आधीच बेताल वक्तव्य आणि बोल्ड फोटोशूटमुळे शर्लिन चर्चेत आहे. आता तिने धक्कादायक विधान करून पुन्हा ती चर्चेत आली आहे. विवाहापूर्वी सेक्स करायलाच पाहिजे. `लिव्ह इन रिलेशन` म्हणजे लग्नासारखे पवित्र संबंध आहेत. त्यामुळे सेक्स करनं गैर नाही, असं तिचं म्हणणं आहे.
`कामसूत्र 3 D` या चित्रपटातील बोल्ड सिनने शर्लिन चर्चेत आली आहे. तिने एका मुलाखातीच्यावेळी शर्लिनने सेक्स, प्रेमसंबंध आणि जोडीदाराकडून अपेक्षा याविषयी मत मांडले. त्यावेळी ती म्हणाली, सेक्समुळे तुमचे नाते अधिक घट होत जाते. दरम्यान, जोडीदाराने दगा दिल्यास त्याला दुस-यांदा पुन्हा संधी देऊ असेही तिने म्हटले आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, December 3, 2013 - 19:41
comments powered by Disqus