प्रियंका चोपडा `आई` झाली

Last Updated: Tuesday, March 25, 2014 - 21:55

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
प्रियंका चोपडा लवकरच आई होणार आहे, कारण ऑलिम्पिक पदक विजेता बॉक्सर मेरीकॉम हिच्यावर एक सिनेमा तयार होतोय. यात मेरिकॉमच्या संघर्षाची कहाणी पडद्यावर येणार आहे.
उमंग कुमारच्या या चित्रपटासाठी प्रियंकाने जोरदार मेहनत घेतली आहे.
प्रियंकाने इंफालला जाऊन मेरीकॉमची भेट घेतली होती आणि मेरीकॉमच्या जीवनाशी संबंधित घटनांना समजून घेतलं होतं. यामुळे भूमिका प्रियंकाला पडद्यावर साकारण्यात मदत होणार आहे.
बॉक्सरसोबत चित्रपटात प्रियंकाला आईचीही भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वी प्रियंकाने ट्वीटरवर रील बेबीचे काही फोटो अपलोड केले होते. यावेळी बेबीसोबत ती सेटवर उपस्थित होती.
प्रियंका या चित्रपटातील बेबी विषयी म्हणते, या छोट्याशा जीवाचे हात पाय, गोड हास्य, आणि छोटसं शरीर खुपचं सुंदर वाटतं, किती नाजूक आहे हे बाळ, असं प्रियंकाने म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, March 25, 2014 - 21:55
comments powered by Disqus