प्रियांकाचा `आय कान्‍ट मेक यू लव मी` अल्बम लॉन्च

By Shubhangi Palve | Last Updated: Wednesday, April 23, 2014 - 13:27

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
`इन माई सिटी एंड एग्‍जॉटिक` या आपल्या पहिल्या-वहिल्या म्युझिक अल्बमनंतर प्रियांचा आणखी एक म्युझिक अल्बम लॉन्च करण्यात आलाय.
नुकताच, प्रियांकाचा `आय कान्‍ट मेक यू लव मी` हा नवीन अल्बम लॉन्च करण्यात आलाय. या अल्बममध्ये केवळ प्रियांकाचा आवाज ऐकायला मिळणार आहे.
प्रियांकानं बरीच प्रतिक्षा केल्यानंतर याला आयट्यूनमध्ये रिलीज करण्यात आलंय. ही माहिती खुद्द प्रियांकानं आपल्या चाहत्यांपर्यंत पोहचवलीय ट्विटरच्या माध्यमातून... गाणं डाऊनलोड करण्यासाठी तिनं गाण्याची लिंकही पोस्ट केलीय.
हे गाणं बोनी रैटच्या १९९१ मध्ये आलेल्या मूळ गाण्याचं इलेक्ट्रोपॉप संस्करण आहे, असं म्हटलं जातंय. परंतु, प्रियांका मात्र हे मानायला तयार नाही. प्रियांका म्हणते, बोनीला पाहून मला गायक बनण्याची प्रेरणा मिळालीय. हे गाणं माझ्यासाठी खूप वेगळं आहे. माझ्या गाण्यात डान्स म्युझिकही आहे.
यापूर्वी आलेल्या... इन माय सिटी या अल्बमलाही कौतुकाची थाप मिळाली होती. यामध्ये प्रियांकानं देसीपणा आणला होता. यामध्ये प्रियांका अमेरिकन- इंटरनॅशनल रॅपर पिटबुलसोबत दिसली होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, April 23, 2014 - 13:27
comments powered by Disqus