रणबीर कपूरला का `प्रेयसी`साठी हवीय `प्रायव्हसी`?

मुंबईत एका न्यूज पेपरमध्ये छापून आलेल्या बातमीनुसार अभिनेता रणबीर कपूरने वांद्र्यात एक घर खरेदी केलंय. रणबीरने अख्खा एक फ्लोअर खरेदी केला आहे.

Updated: Apr 23, 2014, 05:17 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईत एका न्यूज पेपरमध्ये छापून आलेल्या बातमीनुसार अभिनेता रणबीर कपूरने वांद्र्यात एक घर खरेदी केलंय. रणबीरने अख्खा एक फ्लोअर खरेदी केला आहे.
असं म्हटलं जातंय की रणबीरचे वडील ऋषि कपूर सध्या नाराज आहेत.
कारण कटरिना कैफसोबत रणबीरची जवळीक वाढतेय, हे ऋषि कपूर यांची नाराजी असल्याचं सांगण्यात येतंय. याच साठी प्रायव्हसी रहावी म्हणून रणबीरने नवं घर खरेदी केल्याची चर्चा आहे.
या घराच्या इंटेरियरचं सध्या काम सुरू आहे, रणबीर लवकरच या घरात रहायला येणार असल्याची चर्चा आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.