राणी मुखर्जी - आदित्यचं लग्न जानेवारीत?

बॉलिवूडची राणी मुखर्जी आणि फिल्म निर्माता आदित्य चोप्रा ही दोघं अखेर येत्या जानेवारीमध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याचं समजतयं.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 12, 2012, 05:30 PM IST

www.24taas.com, मुंबई
बॉलिवूडची राणी मुखर्जी आणि फिल्म निर्माता आदित्य चोप्रा ही दोघं अखेर येत्या जानेवारीमध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याचं समजतयं. सूत्रांच्या माहितीनुसार, राणी आणि आदित्य यांनी जानेवारी २०१३ मध्ये लग्न करण्याचा निर्णय पक्का केलाय.
गेल्या अनेक दिवसांपासून आदित्य आणि राणी एकमेकांशी यांच्या विवाहाबद्दल अनेक उलटसुलट चर्चा ऐकायला मिळतात. पण, अखेर त्यांनी आपल्या लग्नाचा निर्णय पक्का केल्याचं सिनेक्षेत्रातील सूत्रांनी माहिती दिलीय आणि म्हणूनच राणी कोणताही नवा सिनेमा स्वीकारण्यास टाळाटाळ करत असल्याचंही म्हटलं जातंय. लग्नाची स्वप्न पाहणाऱ्या राणीकडे सध्या एकही सिनेमा नाहीय, अशी माहिती मिळतेय.
राणीनं आपल्या एका दिग्दर्शकाला आपण आपल्या खाजगी कामासाठी जानेवारी महिन्यापर्यंत शुटींगसाठी उपलब्ध राहणार नसल्याचंही कळवलंय. राणीच्या मॅनेजरनंदेखील येत्या वर्षात राणी मुखर्जी लग्न करणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय.

परंतू, काहींच्या मते राणी आणि आदित्यच्या लग्नाची बातमी ही केवळ अफवा ठरू शकते कारण नुकतंच यशराज चोप्रा यांच्या निधनानं शोकाकूल झालेलं चोप्रा कुटुंब अजूनही त्या धक्क्यातून सावरू शकलेलं नाहीय.