अभिनेता रणवीर सिंगला डेंग्यू, रूग्णालयात दाखल

अभिनेता रणवीर सिंगला डेंग्युमुळे रुग्णालयात भरती व्हावं लागले आहे. सध्या तो मुंबईतल्या एका रुग्णालयात उपचार घेत आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 27, 2013, 03:36 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई
अभिनेता रणवीर सिंगला डेंग्युमुळे रुग्णालयात भरती व्हावं लागले आहे. सध्या तो मुंबईतल्या एका रुग्णालयात उपचार घेत आहे.
अली अब्बास जाफरच्या आगामी सिनेमाचं दुर्गापूरमध्ये शूटिंग सुरु असतांना रणवीरला ताप आला होता. अंगात ताप असतांनाही त्याने शूटिंग पूर्ण केलं. मात्र शूटिंग संपवून मुंबई परतल्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रामलीला हा त्याचा आगामी सिनेमा नोव्हेंबर महिन्यात रिलीज होणार असून या सिनेमाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळीने केलं आहे. बँडबाजा बारात, लेडीज व्हर्सेस विकी बहेल, लुटेरा या सिनेमातून त्याने प्रमुख भूमिका बजावली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.