रणवीर सिंहच्या ‘किस’ने नाराज झाली प्रियंका चोपडा

तुम्हांला गुंडे चित्रपटातील रणवीर सिंह आणि प्रियंका चोपडाची हॉट केमेस्ट्री आठवते का. चित्रपटाच्या प्रमोशनवेळी दोघे एकमेकांसोबत मस्ती करताना आपण पाहिले. पण सध्या या दोघांमध्ये काही तरी बिनसलं आहे. सध्या रणवीर आणि प्रियंका चोपडा ‘दिल धडकने दो’ हा जोया अख्तरचा चित्रपट करीत आहेत. पण सध्या ते सेटवर एकमेकांपासून लांब-लांब राहत आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 6, 2014, 07:13 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
तुम्हांला गुंडे चित्रपटातील रणवीर सिंह आणि प्रियंका चोपडाची हॉट केमेस्ट्री आठवते का. चित्रपटाच्या प्रमोशनवेळी दोघे एकमेकांसोबत मस्ती करताना आपण पाहिले. पण सध्या या दोघांमध्ये काही तरी बिनसलं आहे. सध्या रणवीर आणि प्रियंका चोपडा ‘दिल धडकने दो’ हा जोया अख्तरचा चित्रपट करीत आहेत. पण सध्या ते सेटवर एकमेकांपासून लांब-लांब राहत आहे.
शुटींगमध्ये जशी जोया कट म्हणते हे दोन्ही तारे एकमेकांकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. जोयासाठी खूप मोठी अडचणी निर्माण झाली आहे. त्यांच्या या मैत्रीत आलेल्या कटूतेमुळे या प्रोजेक्टवर परिणाम तर होणार नाही ना अशी चिंता सध्या जोयाला सतावते आहे.
दिल धडकने दो यात दोन्ही कलाकार भाऊ आणि बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. रणवीर आणि प्रियंका यांच्यातील वाद खूप जुना आहे. असे सांगितले जाते की, गुंडेच्या शुटिंगपूर्वी एका इव्हेंटमध्ये रणवीरने प्रियंका चोपडाला फ्लाइंग किस दिला होता. त्यामुळे सिनिअर असलेली पिगी चोपडा नाराज झाली होती. त्यानंतर एका इव्हेंटमध्ये प्रियंका चोपडाने रणवीरकडे दुर्लक्ष केले होते. त्यानंतर रणवीरने प्रियंकासोबत काम न करण्याचे ठरवले होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.