`प्यार वाली लव्ह स्टोरी`त दिसणार डॅशिंग सई...

By Shubhangi Palve | Last Updated: Wednesday, April 9, 2014 - 16:08

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
काही मोजक्याच बॉलिवूडमध्ये चित्रपटांतमध्ये दिसलेली मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर लवकरच `प्यार वाली लव्ह स्टोरी` या चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या समोर येतेय.
`दुनियादारी` फेम सईनं मराठी चित्रपटांमध्ये सध्या टॉपवर आहे. मराठी चित्रपटांत वेगवेगळे प्रयोग करत राहणारी सई या चित्रपटात थोडी हटके भूमिका निभावताना दिसणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, या चित्रपटात तिला साथ देतोय `दुनियादारी` फेम स्वप्नील जोशी...
मुख्य म्हणजे, सई या चित्रपटात अॅक्शन अवतारात दिसणार आहे. या चित्रपटासाठी सई बॉक्सिंगचेही धडे घेतेय. मुज्तबा कमाल यांच्याकडून ती सध्या बॉक्सिंगची ट्रेनिंग घेतेय. किक-बॉक्सिंगचा थोडं थोडे धडे गिरवतेय.
बॉक्सिंग शिकण्याबद्दल विचारलं असता सई म्हणतेय, `मला फीट राहायला आवडतं. हा केवळ एक खेळ नाही तर फिट राहण्याचा एक चांगला ऑप्शन आहे. आजकालची मुलं टीव्ही आणि कम्प्युटरमध्ये बिझी असतात. पण, तोच वेळ किक-बॉक्सिंगला दिला तर शारीरिक आणि मानसिकरित्या ते स्वत:ला तंदुरुस्त बनवू शकतात`
`प्यार वाली लव्ह स्टोरी` हा सिनेमा २ ऑक्टोबर २०१४ ला प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी सई दुनियादारी, सौ. शशी देवधर, अशाच एका बेटावर, झपाटलेला २ यांसारख्या मराठी चित्रपटांत तर गजनी, ब्लॅक अॅन्ड व्हाईट आणि विला या हिंदी चित्रपटांत दिसली होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, April 9, 2014 - 16:08
comments powered by Disqus