अभिनेता सैफ अली खान '७५० करोडचा धनी'

By Prashant Jadhav | Last Updated: Thursday, November 8, 2012 - 12:50

www.24taas.com, नवी दिल्ली
नुकतेच करीना कपूरशी मोठ्या धूमधडाक्यात लग्न करणारा अभिनेता सैफ अली खान यांची संपत्ती तब्बल ७५० कोटीच्या घरात आहे. सैफ अली खानची पतोडीमध्ये महल आणि पूर्वंजांची पूर्ण संपत्ती ७५० कोटीची आहे. सैफला त्याचे वडील मंसूर अली खान यांच्या निधनानंतर पतोडीचा १०वा नवाब बनवलं.
मन्सूर अली खान यांनी आपल्या संपत्तीमध्ये कन्या सोहा आणि सबा यांनाही वारस बनवलं आहे. या विषयावर सैफचे बोलणे आहे की, संपत्ती कितीही किमतीची असो. पण ही माझ्या पूर्वंजांची संपत्ती आहे, ती मला खूपच किमती आहे. तसेच सैफने या संपत्ती प्रकरणी असे काहीही बोललेला नाही की, ज्याने वाद निर्माण होईल.
मागील महिन्यात सैफ-करिना लग्नानंतर आता हे नवाब घराने हा संपत्ती प्रकरणाला पूर्णविराम मिळाला आहे. मन्सूर अली खान यांची पत्नी शर्मिला टागोर नबाव पतोडी जमीनीचं प्रकरण बघणार आहे. तसेच असेही बोलण्यात येते की, २००३ मध्ये मन्सूर अली खान आणि त्यांच्या दोन बहिणी सालिहा आणि साबिहा यांच्यामध्ये चाललेले भांडण अजून थांबले नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.First Published: Wednesday, November 7, 2012 - 20:11


comments powered by Disqus