सैफ अली खान अडचणीत, ४ तास केली चौकशी

Last Updated: Saturday, September 8, 2012 - 21:29

www.24taas.com, मुंबई
अभिनेता सैफ अली खानची ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयानं चौकशी केली. सैफनं इम्पोर्टेड कार घेतल्याप्रकरणी त्याची चार तास कसून चौकशी करण्यात आली आहे.
सैफ अली खानने नवी इम्पोर्टेड कार सगळी रोख रक्कम देऊन विकत घेतल्याने त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्यामुळे छोटे नवाब पुन्हा एकदा अडचणीत आली आहे.
ईडीकडून सैफ अली खानची चौकशी करण्यात आल्य़ानंतर त्याला सोडण्यात आलं आहे. मात्र त्यामुळे पुन्हा एकदा सैफ वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.

First Published: Saturday, September 8, 2012 - 21:29
comments powered by Disqus