`गो गोवा गॉन`मध्ये सैफचा हटके लूक

सैफ अली खानला यापूर्वी अनेक वेगवेगळ्या रूपात आपण पाहिलं आहे. ‘रेस-२’ मध्येही त्याचा स्टायलिश आणि कॉर्पोरेट स्टाइलचा लूक आकर्षक वाटत होता. पण आता येणाऱ्या ‘गो गोवा गॉन’ या सिनेमात सैफचा लूक अगदीच विरुद्ध आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 25, 2013, 04:15 PM IST

www.24taas.com, मुंबई
सैफ अली खानला यापूर्वी अनेक वेगवेगळ्या रूपात आपण पाहिलं आहे. ‘रेस-२’ मध्येही त्याचा स्टायलिश आणि कॉर्पोरेट स्टाइलचा लूक आकर्षक वाटत होता. पण आता येणाऱ्या ‘गो गोवा गॉन’ या सिनेमात सैफचा लूक अगदीच विरुद्ध आहे.

आगामी ‘गो गोवा गॉन’ या सिनेमात सैफ अली खान झोंबींची (रक्तपिपासू पिशाच्च) शिकार करणाऱ्या ‘बोरीस’ची भूमिका साकारत आहे. या सिनेमात त्याचे केस सोनेरी आहेत आणि अंगभर वेगवेगळे टॅट्यू बनवलेले आहेत. हा बोरीस धाडसी पण ‘कूल’ माणूस आहे. तसाच तो विनोदीही आहे. त्यामुळे बोरीसच्या भूमिकेसाठी सैफ अली खानने असा हटके लूक धारण केला आहे.
`गो गोवा गॉन` या सिनेमाचा सैफ अली खान सहनिर्मातादेखील आहे. दिनेस विजन सैफसोबत या सिनेमाची निर्मिती करत आहेत. १० मे रोजी हा सिनेमा सिनेमागृहांमध्ये झळकेल.