सलमानच्या फॅन्सचं महिलांशी गैरवर्तन...

By Shubhangi Palve | Last Updated: Saturday, January 18, 2014 - 17:48

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सलमान खानचा आगामी सिनेमा ‘जय हो’चं जोरदार प्रमोशन सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी मुंबईत इनऑर्बिट मॉलमध्ये एका कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पण, इथं सलमानच्या फॅन्सी असा काही गोंधळ उडवून दिला की सलमानलाही लाज वाटावी. या गोंधळादरम्यान उपस्थित असलेल्या महिला प्रेक्षकांना टार्गेट करण्यात आलं आणि त्यांच्याबरोबर अश्लील कृत्यंही करण्याचा प्रयत्नही झाला.
सलमानला आपल्या ‘जय हो’ सिनेमाचं प्रमोशन वेगळ्या पद्धतीनं करायचं होतं. पब्लिक प्लॅटफॉर्मचा वापर करून लोकांसमोर जाऊन आपल्या आगामी सिनेमाच्या काही गोष्टी त्याला प्रेक्षकांशी शेअर करायच्या होत्या. मात्र, या कार्यक्रमात काही उनाड फॅन्सनं एकच गोंधळ केला. हा कार्यक्रम पाहण्यासाठी शेकडो लोक उपस्थित होते.
या गर्दीनं तिथले सगळे बॅरिकेडही तोडले तसेच उपस्थित महिलांशी गैरवर्तनही केलं. यावेळची काही दृश्यं मीडियानं आपल्या कॅमेऱ्यातून टिपली आहेत. या फोटोंमधून या प्रमोशनवेळी महिला गर्दीच्या कशा पद्धतीनं टार्गेट बनल्या हे स्पष्टपणे दिसतंय.
सिक्युरिटी असूनही मॉलच्या पार्किंग एरियामध्ये झालेल्या या कार्यक्रमात गर्दीची मस्ती हाताबाहेर गेली. फॅन्सनं संपूर्ण मॉललाच घेराव घातला होता. या गर्दीत सलमानची सुरक्षाही धोक्यात आली होती. त्यामुळे सलमानला केवळ १० मिनिटांत हा कार्यक्रम आटपावा लागला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, January 18, 2014 - 16:18
comments powered by Disqus