तुमच्या आई, बहिणीचे असे फोटो पाहून काय म्हणाल? - सलमान

By Jaywant Patil | Last Updated: Tuesday, September 17, 2013 - 07:36

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
इबिझामध्ये रणबीर कपूरसोबत बिकिनीमधील कतरिना कैफच्या फोटोंनी चांगली खळबळ माजवली होती. यावर रणबीरने राग व्यक्त केला, कतरिनाने मीडियाशी पत्रव्यवहार केला. अश्रू ढाळले. पण तरीही प्रकरण काही शांत होत नव्हतं. अखेर कतरिनाचा खास मित्र, एक्स- बॉयफ्रेंड आणि बॉलिवूडचा दबंग खान असलेल्या सलमान खानने यावर प्रतिक्रिया दिली.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत सलमान खानला कतरिना कैफच्या बिकिनीमधील त्या फोटोबद्दल विचारलं असता, सलमान खानने कतरिनाची बाजू घेत आपली प्रतिक्रिया दिली. 'तुमची, तुमच्या आई, बहिणीचे असे फोटो दिसून आले, तर तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? नाही, जर तुमच्या बॉयफ्रेंडलाही तुमचा असा फोटो मिळाला तर आवडणार नाही. मला वाटतं, जे तुम्हाला आवडणार नाही, ते इतर कुणालाही आवडणार नाही. जे सिनेमात घडतं, ते ठीक आहे, पण एखाद्याच्या खासगी आयुष्याला असं एक्सपोज करणं योग्य नाही. तसं करण्याचा तुम्हाला अधिकारही नाही', अशा शब्दांत आपली प्रतिक्रिया सलमानने दिली आहे.
सलमान खानने कतरिनाने या फोटोंच्या प्रकाशनानंतर लिहिलेलं पत्रही वाटलं आहे. याबद्दल सलमानला विचारलं असता सलमानने कतरिनाच्या पत्राचं समर्थन केलं आहे. 'हो. मी ते पत्र वाचलं आहे. अतिशय सुंदर, समजुतदारपणे कतरिनाने हे पत्र लिहिलंय. पब्लिक अपिअरन्सपुरतं ठिक आहे. पण खासगी आयुष्यातील व्यक्तिगत फोटो जगासमोर आणणं ही अतिशय खालच्या दर्जाची गोष्ट आहे.
याउलट रणबीरने मात्र कतरिनाच्या बिकिनी लूकचं कौतुक केलं आहे. 'बिकिनीमध्ये कतरिना खूप सुंदर दिसत आहे. इबिझा हेही अतिशय सुंदर ठिकाण आहे. कृपया नक्की तिकडे जाऊन या' अशा शब्दांत रणबीरने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, September 16, 2013 - 16:46
comments powered by Disqus