सलमानला लग्नाशिवाय हवीत मुलं!

By Shubhangi Palve | Last Updated: Thursday, February 21, 2013 - 16:49

www.24taas.com, मुंबई
सल्लू मियाँचा ‘हाजिर-जवाबी’पणा तसा बराच प्रसिद्ध आहे. प्रश्न फेकणाऱ्याला गप्प बसवणंही त्याला चांगलंच माहीत आहे. पण, गोष्ट जेव्हा लग्नावर येते तेव्हा मात्र त्याची प्रतिक्रिया पाहण्यासारख्या असतात...
असाच एक प्रसंग नुकताच घडला. एका कार्यक्रमादरम्यान सलमान खानला लग्नाबद्दल विचारलं गेलं तेव्हा ‘मला लग्नाबद्दल माहिती नाही, पण मला लहान मुलं खूपच आवडतात आणि मलाही वाटतंय की माझीही मुलं असावी’ असं पटकन त्यानं म्हटलं.
‘गुगल प्लस’च्या एका कार्यक्रमादरम्यान सलमान आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देत होता आणि त्याचवेळी कुणीतरी हा प्रश्न त्याला विचारला.

लग्नाबद्दल माहित नाही, पण मुलं हवीत... सलमानच्या या उत्तरानं मात्र उपस्थितांना चांगलंच चक्रावून टाकलं. गुगल प्लसवर ‘बीईंग ह्युमन’ या संस्थेच्या पेज लॉन्च दरम्यान घडलेला या प्रसंगानं उपस्थितांचं चांगलाच मनोरंजनही झालं. सध्या सलमान बीईंग ह्युमनचं जोरदार प्रमोशन करताना दिसतोय.

First Published: Thursday, February 21, 2013 - 16:41
comments powered by Disqus