सलमान खानने केली ५०० कोटींची कमाई

Updated: Nov 26, 2015, 04:41 PM IST
सलमान खानने केली ५०० कोटींची कमाई  title=

सलमान खानने केली ५०० कोटींची कमाई 

मुंबई : बॉलीवूडचा 'दबंग भाईजान' सलमान खान याने बॉलीवूडच्या इतर कलाकांराना मागे टाकत नवा रिकॉर्ड बनवला आहे. आजपर्यत आमिर खान, शाहरूख खान यांना ही करता आले नाही, ते सलमान खानने करून दाखवले आहे. 

बॉलीवुडच्या इतिहासामध्ये एका वर्षात भारतात ५०० कोटींची कमाईचा रिकॉर्ड करणारा, सलमान खान हा पहिला अभिनेता बनला आहे. 

'प्रेम रतन धन पायो' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर भारतात सर्वात जास्त कमाई करण्याचा मान त्याला मिळाला आहे. या आधी आलेल्या 'बजरंगी भाईजान' या चित्रपटांने ३२१ कोटींचा बिझनेस केलेला आणि 'प्रेम रतन धन पायो' या चित्रपटांने २०० कोटींचा बिजनेस केला. या दोन्ही चित्रपटांची मिळू कमाई एकूण ५२१ कोटींचा गल्ला जमविला आहे. 

अशा प्रकारे एका वर्षात दोन चित्रपटाच्या माध्यमातून ५०० कोटींपेक्षा अधिक कमाई करणारा सलमान खान हा पहिला अभिनेता आहे. 

यापूर्वी आमिर खानच्या पीकेने देशांतर्गत ३३२ कोटींची गल्ला कमावून रेकॉर्ड केला होता. आता हा रेकॉर्ड सलमानच्या बजरंगी आणि प्रेम रतनने मिळून मोडला आहे. प्रेम रतन धन पायो चित्रपट तिसऱ्याच दिवशी १०० कोटी क्लबमध्ये सामील झाला होता. 

सलमानचा हा लागोपाठ नववा चित्रपट आहे ज्याने १०० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. 

सलमान एकमेव अभिनेता आहे की त्याच्या तीन चित्रपटांनी लागोपाठ २०० कोटींचा पल्ला गाठला आहे. यात किक, बजरंगी, भाईजान आणि प्रेम रतन धन पायो यांचा समावेश आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.