सलमान-संगीताचा `विकेन्ड प्लान` फुटला

By Shubhangi Palve | Last Updated: Thursday, May 1, 2014 - 19:30

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आपल्या संबंधांबद्दल अनेकदा चर्चेत येणारा अभिनेता सलमान खान आता पुन्हा चर्चेत आलाय तो त्याच्या भूतकाळातील संबंध वर्तमानकाळात आल्यानं...
होय, सध्या सलमान खान आणि संगीता बिजलानी यांच्या संबंधाची जोरदार चर्चा बॉलिवूडमध्ये सुरू आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी संगीता बिजलानी आणि सलमान खान यांच्यावर प्रेमाचा रंग चांगलाच चढला होता.
संगीता बिजलानी आणि सलमानच्या आता कित्येक वर्षानंतर पुन्हा एकदा गाठीभेटी सुरू झाल्यात. ही गोष्ट इथवरच थांबलेली नाही तर येणारा विकेन्ड हे दोघं सलमानच्या पनवेलस्थित फर्म हाऊसवर एकत्र एन्जॉय करणार आहेत.
पोलंडमध्ये आपल्या आगामी ‘किक’ या सिनेमाचं शूटींग संपवून मुंबईत दाखल झालेला सलमान आपल्या फार्म हाऊसवर जाण्याच्या तयारीत आहे. तर संगीता मात्र सध्या एका चित्रपटासाठी दिल्लीमध्ये आहे.
सलमान खान आणि संगीता बिजलानी एकेकाळी एकमेकांबाबत खूपच गंभीर होते. परंतु, त्यानंतर सलमानच्या आयुष्यात सोमी अलीनं प्रवेश केला आणि संगीताच्या आयुष्यात क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीनं... संगीतानं अझरुद्दीनशी लग्न केलं. आज संगीता आणि सलमान एकमेकांचे चांगले ‘फेन्डस्’ असल्याचं सांगतात. सलमानच्या घरी संगीताचं येणं-जाणंही सुरू असतं. परंतु, सध्या त्यांच्या भेटीगाठी भलत्याच वाढल्यात.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 1, 2014 - 19:30
comments powered by Disqus