शाहरुख-दीपिकाच्या `हॅप्पी न्यू -इअर`चं पोस्टर रिलीज

फराह खान दिग्दर्शित आणि शाहरुख खानचा सध्या चर्चेत असलेला `हॅप्पी न्यू -इअर`चं या चित्रपटाचे पोस्टर न्यू इअरच्या दिवशी प्रदर्शित करण्यात आलं. हे पोस्टर एक फुल पेज अॅडप्रमाणं असून १ जानेवारी रोजी वृत्तपत्र छापण्यात आलं. या व्यतिरिक्त फेसबुक आणि ट्विटरवर या पोस्टरचं प्रमोशन एका नवीन शैलीत करण्यात आलं. या पोस्टरवर चित्रपटातील स्टार शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि अभिषेक बच्चन यांचे ऑटोग्राफ देखील छापण्यात आले आहेत.

Updated: Jan 2, 2014, 08:46 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
फराह खान दिग्दर्शित आणि शाहरुख खानचा सध्या चर्चेत असलेला `हॅप्पी न्यू -इअर`चं या चित्रपटाचे पोस्टर न्यू इअरच्या दिवशी प्रदर्शित करण्यात आलं. हे पोस्टर एक फुल पेज अॅडप्रमाणं असून १ जानेवारी रोजी वृत्तपत्र छापण्यात आलं. या व्यतिरिक्त फेसबुक आणि ट्विटरवर या पोस्टरचं प्रमोशन एका नवीन शैलीत करण्यात आलं. या पोस्टरवर चित्रपटातील स्टार शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि अभिषेक बच्चन यांचे ऑटोग्राफ देखील छापण्यात आले आहेत.
रिलीजच्या काही तासानंतर `हॅप्पी न्यू –इअर’ या चित्रपटाचं पोस्टर हॅशटॅगद्वारं ट्विटरवर दिसण्यास सुरुवात झाली. या पोस्टरला आतापर्यंत ४५ हजार पेक्षाही जास्त वेळा ट्वीट करण्यात आलंय. चित्रपटाच्या डिजिटल प्रमोशनासाठी `हॅप्पी न्यू –इअर’च्या टीमनं एक पाऊल उचलून सोशल मीडियाद्वारे फॅन्सला `हॅप्पी न्यू –इअर’ चित्रपटाचं पोस्टर स्टारद्वारे ऑटोग्राफ करुन पाटवण्यात आलं. या चित्रपटात अॅक्शन आणि कॉमिडीच्या सहाय्यानं फराह खान आणि शाहरुख खान यांची पुन्हा एकदा जोडी बनली आहे.
फराह खानच्या पहिल्या दोन्ही चित्रपटात `मैं हूं ना` आणि `ओम शांती ओम` या चित्रपटात शाहरुख खान हिरो होता. तसंच हे दोन्ही चित्रपट सुपरहीट ठरले होते. त्यानंतर फराह आणि शाहरुख वेगळे झाले आणि फराहचा `तीसमार खां’ हा चित्रपट सुपर फ्लॉप राहिला. त्याचबरोबर शिरीष कुंदर यांचाही ‘जोकर’ हा चित्रपट फ्लॉप झाला. काही काळानंतर शाहरुख आणि फराहमध्ये पुन्हा जवळीक निर्माण झालीय.
`हॅप्पी न्यू –इअर’मध्ये शाहरुख, दीपिका आणि अभिषेक यांच्या व्यतिरिक्त बोमन ईरानी, सोनू सुद आणि विवान शाह हे ही या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाला शाहरुख खानची कंपनी रेड चिलीज इंटरटेनमेंट प्रोड्यूस करत आहे. हा चित्रपट २३ ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात येणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.