अरे व्वा... अखेर भांडण संपवून सलमान-शाहरुख एकत्र

बॉलिवूडमधील खान कोणत्या न कोणत्या कारणांसाठी चर्चेत असतात. मग त्यात ‘किंग खान’ आणि ‘दबंग’ला विसरुन कसं चालेल? पाच वर्षांपासून एकमेकांशी आणि एकमेकांबद्दल न बोलणारे, अगदी नजरभेट ही टाळणारे सलमान आणि शाहरुखमधील वैर बॉलिवूडमधील चर्चेचा विषय बनला होता.

Updated: Nov 3, 2013, 12:13 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलिवूडमधील खान कोणत्या न कोणत्या कारणांसाठी चर्चेत असतात. मग त्यात ‘किंग खान’ आणि ‘दबंग’ला विसरुन कसं चालेल? पाच वर्षांपासून एकमेकांशी आणि एकमेकांबद्दल न बोलणारे, अगदी नजरभेट ही टाळणारे सलमान आणि शाहरुखमधील वैर बॉलिवूडमधील चर्चेचा विषय बनला होता.
पण मध्यंतरीच्या काळात त्यांच्यातील हे वैर संपलं. आता त्यांच्यात ऐकमेकांबद्दल काहीच द्वेश नाही, तसंच सलमानसह सिल्व्हर स्क्रिनवर काम करण्यास काही हरकत नसल्याचं शाहरुखनं सांगितलं.
दोन्ही खान सिनेमात एकत्र दिसण्याची शक्याता आहे का? याबाबत विचरलं आसता, “निर्माता आणि दिग्दर्शक एक चांगली स्क्रिप्ट घेउन यायला हवे. जर एकत्र काम करण्याची संधी मिळाली, तर नक्कीचं आम्ही एकत्र काम करू. जर असं झालं तर ठीक आहे, नाही तरी ठीक आहे”, असं शाहरुखनं स्पष्ट केलं.
आमच्यात कोणताच वाद नाही आहे. आमचे मार्ग देखिल वेगळे आहे. आमच्या दोघात अहंकाराची कोणतीच भावना नाही. आम्ही एकमेकांच्या परिवाराचा आदर करतो. विशेष म्हणजे सलमान आणि शाहरुख १९९५ मध्ये ‘करन-अर्जुन’ सिनेमात एकत्र काम करताना दिसले होते. परंतू २००८ मध्ये कतरिना कैफच्या वाढदिवशी सलमान आणि शाहरुख खान यांच जोरदार भांडण झालं होतं. हा वाद इतका ताणला गेला की, कधी काळी मित्र असणारे, एकमेकांचे शत्रू झाले होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.