अभिनेता शाहिदची बहीण बॉलिवूडमध्ये !

Last Updated: Friday, March 28, 2014 - 19:05

www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलिवूडमध्ये लवकरच ग्लॅमरस अभिनेत्री एंट्री करणार असल्याची चर्चा आहे. या नवोदीत अभिनेत्रीला तुम्ही अनेक कार्यक्रमात हजेरी लावताना पाहिलं पण असेल.
मात्र ही दुसरी तिसरी कोणी नसून चक्क बॉलिवूडतील चॉकलेट बॉय शाहिद कपूरची लहान बहीण सना आहे.
अलीकडेच सना रजत कपूर दिग्दर्शित `आँखो देखी` चित्रपटांच्या प्रीमियरला कुटुंबियांसोबत हजर होती. त्यामुळे सना बॉलीवूडमध्ये येणार असल्याचे म्हटलं जातंय.
सनाचे वडील पकंज कपूर आणि आई सुप्रिया पाठक हे कलाकार बॉलिवूडमध्ये असताना, तिला लगेच काम मिळणे शक्य आहे. मात्र गोंडस चेहऱ्याच्या सनाला `फिगर मेंटेन` करावी लागणार आहे.
याआधीही ती चित्रपटात दिसणार होती. मात्र अजून काही तिच्या सिनेमांची चर्चासुद्धा नाही. तर मग बघूया! चॉकलेट बॉय आपल्या बहिणीसाठी काय करतो ते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, March 28, 2014 - 13:54
comments powered by Disqus