शाहरुखवर गुन्हा दाखल, केला होता तिरंगा उलटा

By Jaywant Patil | Last Updated: Tuesday, August 21, 2012 - 15:28

www.24taas.com, पुणे

राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी अभिनेता शाहरुख खानविरुद्ध चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकजनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय सचिव रवींद्र ब्रह्मे यांनी फिर्याद दिली आहे.
शाहरुखने ‘मन्नत’मधून निघताना राष्ट्रध्वजाला उलटा करून हवेमध्ये फिरवला, अशी बातमी टीव्ही-९ (कन्नड) या वृत्तवाहिनीने प्रसारित केली होती. फेसबुक आणि यु-ट्यूबवरही या प्रसंगाचे अनेक व्हिडिओ दिसत आहेत. भगवा, पांढरा आणि हिरवा या क्रमाने तीन रंग तिरंग्यावर एसतात. मात्र शाहरुख खानेने तिरंगा उलटा धरून हिरवा रंग वर आणि भगवा रंग खाली अशा चुकीच्या क्रमाने तिरंगा धरला.अशा प्रकारे तिरंगा धरणं हा राष्ट्रध्वजाचा अवमान ठरतो.
तिरंगा लटा धरण्याचा प्रकार शाहरुखने जाणून बुजून केला की ती निव्वळ एक चूक होती, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. इतरवेळी देशभक्तीचे गोडवे गाणाऱ्या आणि फिर भी दिल है हिंदूस्तानी, स्वदेस, चक दे इंडिया यांसारख्या देशभक्तिपर सिनेमांमध्ये भारताचा झेंडा उंचावणाऱ्या शाहरुखला राष्ट्रध्वजाचा क्रमही लक्षात राहू नये, हे खेदाची बाब आहे. आता गुन्हा दाखल केल्या शाहरुख यावर काय प्रतिक्रिया देतोय, हे पाणं महत्वाचं ठरेल..

First Published: Tuesday, August 21, 2012 - 09:23
comments powered by Disqus